४३ हजार बांधकाम मजुरांना दीड हजार रुपये; नोंदणी नसलेल्यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:29 IST2021-04-16T04:29:46+5:302021-04-16T04:29:46+5:30

हिंगोली : जिल्ह्यात वर्षभरापूर्वी ४३ हजार बांधकाम मजुरांची नोंदणी झालेली आहे. ज्यांनी नूतनीकरण केले आहे, अशानाच शासनाच्या नियमाप्रमाणे दीड ...

One and a half thousand rupees to 43 thousand construction workers; What about the unregistered? | ४३ हजार बांधकाम मजुरांना दीड हजार रुपये; नोंदणी नसलेल्यांचे काय?

४३ हजार बांधकाम मजुरांना दीड हजार रुपये; नोंदणी नसलेल्यांचे काय?

हिंगोली : जिल्ह्यात वर्षभरापूर्वी ४३ हजार बांधकाम मजुरांची नोंदणी झालेली आहे. ज्यांनी नूतनीकरण केले आहे, अशानाच शासनाच्या नियमाप्रमाणे दीड हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे कामगार कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.

सर्वत्र कोरोना महामारीचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणची बांधकामे ठप्प आहेत. परिणामी बांधकाम मजुरांच्या हाताला कामे राहिली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे पाहून शासनाने नोंदणी केलेल्या बांधकाम मजुरांना दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले असून ते त्यांना लवकरच दिले जाणार आहेत.

गतवर्षी ५३ हजार बांधकाम मजुरांची नोंदणी झाली होती. यामध्ये नोंदणी केलेले बांधकाम मजूर हे ४३ हजार आहेत. शासनाने आर्थिक मदत म्हणून दीड हजार रुपये जाहीर केले आहेत. परंतु, त्या संदर्भात सूचना अजून काही आली नाही. शासनाच्या सूचनेप्रमाणे नोंदणीकृत असलेल्या मजुरांना ही मदत दिली जाणार असल्याची माहिती दुकान निरीक्षक नामदेव भिसे यांनी दिली.

प्रतिक्रिया

कोरोनाने जगणे मुश्कील करून सोडले आहे. शासनाने नोंदणी केलेल्या मजुरांना दीड हजार रुपये देऊ केले आहेत. आम्हांला तर कोणी वालीच दिसत नाही. शासनाने आमचाही विचार करावा.

-आकाश उंचाडे, बांधकाम मजूर

एकवेळ जेवण करून आज दिवस काढत आहोत. सध्या मजुरीचे कामही मिळत नाही. अनेक ठिकाणची बांधकामेही बंद आहेत. कोणाच्या तरी शेतात काम करण्याची वेळ आली आहे. शासनाने आम्हांला मदत करावी.

-प्रभाकर मुखमहाले, बांधकाम मजूर

नाव नोंदणी केलेल्या बांधकाम मजुरांना शासनाने दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. नोंदणी नसली म्हणून काय झाले? आम्ही पण मजूर आहोत. आम्हांलाही शासनाने थोडीतरी मदत द्यावी. म्हणजे संसार चालेल.

-आकाश उंचाडे, बांधकाम मंजूर

Web Title: One and a half thousand rupees to 43 thousand construction workers; What about the unregistered?