शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हातातोंडाशी आलेला घास हिरावला; शाॅर्टसर्किटने काढणीचा दीड एकरातील गहू जळून खाक

By रमेश वाबळे | Updated: March 3, 2025 17:09 IST

काढणीसाठी आलेला दीड एकरांतील गहू शाॅर्टसर्किटने जळून खाक झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे.

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव (सोळंके) शिवारात शाॅर्टसर्किटने आग लागून दीड एकरातील गहू जळून खाक झाल्याची घटना ३ मार्चला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे दीड लाख रुपयांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता.

हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथील शेतकरी वंदना उत्तम दिपके यांचे शेत येहळेगाव (सोळंके) शिवारातील गट क्रमांक १९७ मध्ये आहे. त्यांनी दीड एकरात गहू पेरला होता. हा गहू काढणीला आला असताना ३ मार्चला दुपारी शेतातून गेलेल्या वीज तार वाऱ्यामुळे एकमेकांना चिकटल्या आणि ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या वाळलेल्या गव्हावर पडल्याने आग लागली. दुपारची वेळ असल्यामुळे प्रखर ऊन आणि वाऱ्याचा वेग असल्यामुळे काही क्षणांतच आग झपाट्याने पसरली.

शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, जवळपास दीड एकरातील गहू जळून खाक झाला. या शेतात जवळपास २५ क्विंटल गव्हाचे उत्पादन होणार होते. आता मात्र क्विंटलभरही गहू निघणार नसल्याने शेतकरी महिला वंदना उत्तम दिपके यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती महावितरण, महसूल विभागाला देण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

हातातोंडाशी आलेला घास हिरावलाकाढणीसाठी आलेला दीड एकरांतील गहू शाॅर्टसर्किटने जळून खाक झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन घटले. बाजारपेठेत भावही समाधानकारक मिळाला नसल्याने लागवडखर्चही वसूल झाला नाही. अशा परिस्थितीत शेतकरी महिला वंदना दिपके यांचा गहू जळाल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. महावितरण कंपनी, महसूल विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली