शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाचे धक्कादायक कृत्य; मावशीसमोरच घेतली कालव्यात उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 18:15 IST

गावी जाताना अचानक पुलावर दुचाकी थांबवली, काही कळायच्या आत मावशी समोरच तरुणाची कालव्यात उडी

- रमेश कदमआखाडा बाळापूर (जि. हिंगोली): पुण्यात एमपीएससीची तयारी करणारा तरूण गावाकडे आला होता. आज सकाळी त्याने मावशीसमोरच इसापूर धरणाच्या कालव्यात उडी घेतल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिस व गावकरी त्याचा शोध घेत आहेत. सूरज उत्तम माने (वय २५, रा. कान्हेगाव) असे कालव्यात उडी घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील पिंपरी शिवारात घडली.

सुरज माने हा अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन पुण्यात एमपीएससीची तयारी करीत होता. अधून-मधून गावाकडे येत होता. काही दिवसांपूर्वीच तो गावाकडे आला होता. आज सकाळी त्याच्या मावशीला आखाडा बाळापूर येथे सोडण्यासाठी दुचाकीवर निघाला होता. त्याची दुचाकी कान्हेगावपासून काही अंतरावरील पिंपरी शिवारात आली असताना सूरजने अचानक कालव्याच्या पुलावर दुचाकी थांबवली. अचानक दुचाकी का थांबविली अशी विचारणा मावशीने केली. मात्र, काही कळण्याच्या आत कालव्याकडे धाव घेत सुरजने कालव्यात उडी घेतली.सध्या कालव्यात पाणी असल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पिंपरी व कान्हेगाव येथील ग्रामस्थानी घटनास्थळाकडे धाव घेतली. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार नागोराव बाभळे, विट्ठल जाधव यांच्या पथकाने दाखल झाले. पोलिस व गावकऱ्यांनी बेपत्ता सूरजचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, सुरजने कालव्यात उडी का घेतली, याचे कारण समजू शकले नाही. दुपारी उशिरापर्यंत त्याचा शोध सुरूच होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीMPSC examएमपीएससी परीक्षा