शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉलरशिपच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी शिक्षकाला बदडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 19:30 IST

शाळेतच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी बदडले

वारंगा फाटा (जि. हिंगोली) : तोंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकाला शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करताना पालकांनी पकडले. यानंतर बेदम चोप देत त्याला आखाडा बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना शुक्रवारी घडली.

सध्या सर्व शाळांना उन्हाळी सुटी लागली आहे; परंतु तोंडापूर येथील प्रभारी मुख्याध्यापक भगवान पंडितराव अवचार हा १० ते ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींना नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेच्या शिकवणीसाठी म्हणून शाळेत बोलवायचा. यावेळी उपस्थित मुलींपैकी दररोज एका मुलीला वेगळ्या वर्गखोलीत घेऊन जात विविध प्रकारे अश्लील चाळे करीत असे. याविषयी घरी सांगाल तर बघा, अशा धमक्या देत असे. हा प्रकार मागील बऱ्याच दिवसापासून सुरू होता.

हा प्रकार अखेर विद्यार्थिनींनी पालकांना सांगितला. त्यानुसार रोजच्या प्रमाणे सर्व मुली शाळेत आल्या. त्यानंतर शिक्षकाचा रोजच्या प्रमाणे शिकवणीऐवजी भलताच वर्ग सुरू झाला. हा प्रकार ग्रामस्थांनी पाहिला आणि रंगेहाथ पकडलेल्या गुरुजीला ग्रामस्थांनी चोप दिला. त्यानंतर या शिक्षकाला एका वर्गखोलीत डांबून ठेवून आखाडा बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती वारंग्याचे बीट जमादार शेख बाब यांनी दिली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शनीचा भक्तही होता शिक्षकहा शिक्षक मागील काही वर्षांपासून शनीचा भक्त बनला होता. काळे वस्त्र परिधान करून त्याने दाढीही वाढविली होती. मात्र, एका शिक्षकाचे बदललेले हे रूप ग्रामस्थांनी आधी धार्मिक वृत्ती समजून दुर्लक्षित केले. मात्र, आज घडलेल्या प्रकारानंतर हे कोणत्या संहितेत बसते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याला वेळीच आळा घातला असता तर कदाचित हा प्रकार घडला नसता, अशी चर्चा आता सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली