शहरात वानरांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:29 IST2021-03-05T04:29:39+5:302021-03-05T04:29:39+5:30

अनेक वाहने हाेताहेत पंक्चर हिंगोली : शहरातील गायत्री शक्तिपीठसह खुशाल नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील महिनाभरापूर्वी बारीक गिट्टी टाकण्यात आली. ...

The nuisance of monkeys increased in the city | शहरात वानरांचा उपद्रव वाढला

शहरात वानरांचा उपद्रव वाढला

अनेक वाहने हाेताहेत पंक्चर

हिंगोली : शहरातील गायत्री शक्तिपीठसह खुशाल नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील महिनाभरापूर्वी बारीक गिट्टी टाकण्यात आली. यानंतर या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. परिणाम हा रस्ता पूर्णपणे उखडला असून बारीक असणाऱ्या गिट्टीमुळे चारचाकी वाहनांसह दुचाकी वाहने पंक्चर होत आहेत. यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांतून रोष निर्माण होत आहे.

झाडे वाळण्याच्या मार्गावर

हिंगोली : शहरातील विविध भागांत सामाजिक संस्थाकडून वृक्षलागवड करण्यात आली आहे. दोन महिन्यांपर्यंत या झाडांकडे लक्ष देण्यात आल्यानंतर आता अनेक झाडे पाण्याअभावी वाळत चालली आहे. अनेक रस्त्याच्या काठी लावलेल्या झाडांकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे बरेच वृक्ष नष्ट होत चालले आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

Web Title: The nuisance of monkeys increased in the city