आता एका क्लीकवर मिळणार रेशनकार्डची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST2021-03-23T04:31:51+5:302021-03-23T04:31:51+5:30

घरातील प्रत्येकांकडे ॲण्ड्राइड मोबाइल उपलब्ध झाला आहे. मोबाइलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती घरबसल्या उपलब्ध होत आहे. नागरिकांना शासनाच्या ...

Now you can get ration card information with a single click | आता एका क्लीकवर मिळणार रेशनकार्डची माहिती

आता एका क्लीकवर मिळणार रेशनकार्डची माहिती

घरातील प्रत्येकांकडे ॲण्ड्राइड मोबाइल उपलब्ध झाला आहे. मोबाइलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती घरबसल्या उपलब्ध होत आहे. नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळावी, तसेच पारदर्शकता रहावी, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. याच अनुषंगाने केंद्र शासनाने वन नेशन वन रेशनकार्ड या उपक्रमानंतर मेरा रेशन हे मोबाइल ॲप आणले आहे. प्ले स्टोअरमधून ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या रेशन कार्डसंबंधी सर्व माहिती आपल्याला घर बसल्या पाहता येणार आहे, तसेच आपण राहत असलेल्या भागातील रेशन दुकान, आपल्या नावे किती धान्य आले, कोणकोणते धान्य आले, मागील धान्य कधी उचलले होते, याची माहिती आपल्याला पाहता येणार आहे. सर्वच माहिती लाभार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याने रेशन दुकानदारांवर चाप बसण्यास मदत होणार आहे.

क्लीकवर मिळणार ही माहिती

लाभार्थींना मिळणारे धान्य, जवळपास असलेले रास्त भाव दुकान, शिधापत्रिकेवर उचललेल्या धान्याची माहिती, शिधापत्रिका पात्र की अपात्र, याची माहिती एका क्लीकवर मिळणार आहे. यामुळे लाभार्थींना किरकोळ कामासाठी तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.

तक्रार ॲपवर नोंदवा

रेशनकार्डधारकांना आपल्या रेशनकार्डबाबत किंवा धान्याबाबत काही तक्रार करावयाची असल्यास त्यासाठी पुरवठा विभाग किंवा तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. मोबाइल ॲपवर घरबसल्या तक्रार नोंदविता येणार आहे.

प्रतिक्रीया...

रेशन कार्डधारकांनी आपल्या मोबाइलवर मेरा रेशन नावाने ॲप डाऊनलोड करावे. ॲपच्या माध्यमातून आपल्याला रेशनसंदर्भात माहिती घरबसल्या उपलब्ध होणार आहे, तसेच धान्य दुकानदार, सुविधेबाबत तक्रारही घरबसल्या करता येणार आहे.

-मुजीब पठाण, जिल्हा तांत्रिक अधिकारी, पुरवठा विभाग, हिंगोली.

एकूण रेशन कार्ड - १८८८७३

अंत्योदय - २६३५९

अन्न सुरक्षा - १३१८३८

शेतकरी - ३०७७६

Web Title: Now you can get ration card information with a single click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.