अविश्वासाच्या बैठकीस गैरहजर शिवसेना सदस्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST2021-06-20T04:20:50+5:302021-06-20T04:20:50+5:30
हिंगोली जिल्हा परिषदेत शिक्षण व अर्थ सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावरील अविश्वासाचे सभेस शिवसेनेचे तब्बल चार सदस्य गैरहजर राहिले जात ...

अविश्वासाच्या बैठकीस गैरहजर शिवसेना सदस्यांना नोटीस
हिंगोली जिल्हा परिषदेत शिक्षण व अर्थ सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावरील अविश्वासाचे सभेस शिवसेनेचे तब्बल चार सदस्य गैरहजर राहिले जात होते. शिवसेनेत पक्षविरोधी वागणुकीला गद्दारी मानल्या जाते. त्यामुळे या प्रकाराची एकच चर्चा झाली होती. या सभेला हजर राहून अविश्वासाचे बाजूने मतदान करण्यास सदस्यांना सांगण्यात आले होते. मात्र त्याला न जुमानता शिवसेनेच्या चार महिला सदस्यांनी हजेरी लावलीच नाही. यात शेवाळ्याच जि.प.सदस्या तथा माजी जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, कोथळजच्या वैष्णवी घुगे, पिंपळदरीच्या सरस्वती घुगे व जवळा बाजारच्या जीवनलता परिहार यांचा समावेश आहे. याची जिल्ह्यात मोठी चर्चा झाली. जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनाही याबाबत विचारणा झाली होती. त्यावरून शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई यांनी या चारही सदस्यांना नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले की, हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बंडखोर शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करावे,असा पक्षादेश असतानाही त्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पक्षातर्फे आपणाविरुद्ध अनर्हतेच्या कारवाईची शिफारस विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे का करू नये? याबाबत ७ दिवसांत स्पष्टीकरण शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पाठविण्यासही बजावले आहे. यावरून एका माजी लोकप्रतिनिधींनाही नोटीस दिल्याची चर्चा रंगत आहे. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही.
याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख आ. संतोष बांगर यांना विचारले असता ते म्हणाले, पक्षविरोधी वागणाऱ्यांना या सदस्यांबाबत पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. त्यांचे खुलासे सादर झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्यावर योग्य तो निर्णय घेईल.
याबाबत जिल्हाप्रमुख