Nine new carina patients in the district; 15 good | जिल्ह्यात काेराेनाचे नवीन नऊ रुग्ण; १५ बरे

जिल्ह्यात काेराेनाचे नवीन नऊ रुग्ण; १५ बरे

जिल्ह्यात सेनगाव परिसरात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये तीन जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही, तर हिंगोली व कळमनुरी परिसरातील रुग्णांची तपासणी केली असता हिंगोली परिसरात पाच, तर कळमनुरी परिसरात चार असे नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डातील दोन व कळमनुरी परिसरातील एक असे एकूण तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत ३ हजार ७०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यापैकी ३ हजार ५५७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजघडीला ९१ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत एकूण ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑयसोलेशन वॉर्डात उपचार घेणाऱ्या सहा रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Nine new carina patients in the district; 15 good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.