शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची जोरदार धडक अन् नीलगाय थेट विद्युत वाहिनीवर; रेल्वेसेवा दोन तास ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:54 IST

पूर्णा- अकोला मार्गावरील रेल्वे गाड्या दोन तास उशिराने धावल्याने प्रवाशांना मनस्ताप

- इस्माईल जहागीरदारवसमत: जुनोना रेल्वे स्टेशनजवळ अचानक रुळावर आलेल्या निलगाईस रेल्वेची जोरदार धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की, नीलगाय हवेत उडून थेट रेल्वेच्या विद्युत वाहिनीवर अडकली. यामुळे अकोला- पूर्णा मार्गवारील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. निलगायला विद्युत वाहिनीवरून काढेपर्यंत रेल्वेसेवा ठप्प होती. ही घटना आज पहाटे घडली.

आज पहाटे पूर्णा-अकोला-पूर्णा रेल्वे अकोलाकडे मार्गस्थ होती. वसमत तालुक्यातील जुनोना रेल्वे स्टेशन परिसरात अचानक रुळावर आलेल्या निलगाईस रेल्वे इंजिनची जोरदार धडक बसली. जोरदार धडकेने नीलगाय हवेत उंच उडून समोरील रेल्वे विद्युत तारावर जाऊन अडकली. यामुळे या मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली. 

दरम्यान, रेल्वेच्या कर्मचाऱ्याने क्रेनच्या साह्याने विद्युत वाहिनीवर अडकलेल्या निलगाईस खाली काढले. त्यानंतर पूर्णा येथून निघालेली रेल्वे अकोल्याकडे रवाना झाली. परिणामी पूर्णा ते अकोला व अकोला ते पूर्णा अशी रेल्वे क्रॉसिंग हिंगोली येथे नियमित होते ती आज सकाळी बोल्डा रेल्वे स्टेशनवर झाली. तसेच या मार्गावरील रेल्वे गाड्या दिड ते दोन तास उशिराने धावल्या. यामुळे रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, पूर्णा ते अकोला रेल्वे मार्गावर अपघाच्या घटनेत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यासोबतच लहान मोठे वन्यप्राणी देखील रेल्वेला धडकून जखमी होऊन मृत्यूमुखी पडत आहेत. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीHingoliहिंगोलीAccidentअपघात