हिंगोली शासकीय विश्रामगृहाची नळजोडणी कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:33 IST2018-03-10T00:33:41+5:302018-03-10T00:33:45+5:30
सध्या नगरपालिकेची करवसुली जोमात सुरू आहे. पथके सकाळीच घरी शासकीय विश्रामगृहाची नळजोडणी कापल्याने ऐनवेळी फजितीची वेळ आली आहे.

हिंगोली शासकीय विश्रामगृहाची नळजोडणी कट
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सध्या नगरपालिकेची करवसुली जोमात सुरू आहे. पथके सकाळीच घरी शासकीय विश्रामगृहाची नळजोडणी कापल्याने ऐनवेळी फजितीची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागास हा कर भरण्यासाठी वारंवार कळवून दाद मिळत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
शासकीय विश्रामगृहाकडे मालमत्ता कराची ५.४२ लाखांची तर पाणीपट्टीची २.६८ लाखांची थकबाकी आहे. जवळपास आठ लाख रुपये थकले असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही रक्कम भरली नाही. त्यामुळे शासकीय विश्रामगृहाची नळ जोडणी तोडण्यात आली आहे. यामुळे शासकीय विश्रामगृहास पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. शहरातील सर्व शासकीय कार्यालये व खाजगी मालमत्ता धारकांनी वेळेत कर भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. अन्यथा मालमत्ता सील करण्यासह नळजोडणी तोडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.