कोरोनाचा नवा एक रुग्ण; चार बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:21 IST2021-07-18T04:21:44+5:302021-07-18T04:21:44+5:30

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोलीत ३०, सेनगावात ३५, औंढ्यात १९, वसमतला ८१ तर कळमनुरीत १४५ चाचण्या करूनही कुणी बाधित आढळले ...

A new patient of Corona; Four heals | कोरोनाचा नवा एक रुग्ण; चार बरे

कोरोनाचा नवा एक रुग्ण; चार बरे

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोलीत ३०, सेनगावात ३५, औंढ्यात १९, वसमतला ८१ तर कळमनुरीत १४५ चाचण्या करूनही कुणी बाधित आढळले नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीत २०६, औंढ्यात ३३, वसमतला १२८, कळमनुरीत ४९ चाचण्यात एकही बाधित नाही. सेनगावात ३८ पैकी एक बाधित असून, ती ९४ वर्षीय महिला आहे. आज नवीन कोविड सेंटरमधून बरे झालेल्या चार जणांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १५ हजार ९६३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ हजार ५७० जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे, तर सध्या ७ जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दाखल असलेल्यांपैकी तीन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: A new patient of Corona; Four heals