कोरोनाचा नवा एक रुग्ण; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST2021-06-22T04:20:47+5:302021-06-22T04:20:47+5:30

हिंगोली जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली परिसरात १४९ पैकी देवडानगरात १ रुग्ण आढळला, तर वसमत १४१, सेनगाव १६७, औंढ्यात २९७ ...

A new patient of Corona; Death of one | कोरोनाचा नवा एक रुग्ण; एकाचा मृत्यू

कोरोनाचा नवा एक रुग्ण; एकाचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली परिसरात १४९ पैकी देवडानगरात १ रुग्ण आढळला, तर वसमत १४१, सेनगाव १६७, औंढ्यात २९७ व कळमनुरीला २१० चाचण्यांमध्ये एकही बाधित नाही. हिंगोली परिसरातील १३ जणांचे आरटीपीसीआर चाचणीचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. बरे झाल्याने घरी सोडलेल्यांमध्ये सोमवारी जिल्हा रुग्णालयातील ३, औंढा येथील १ व सिद्धेश्वर येथील चौघांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोनाने जिल्हा रुग्णालयात दाखल समगा येथील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा ३८१ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १५ हजार ९०७ रुग्ण आढळून आले. यापैकी १५ हजार ४९१ जण बरे झाले, तर सध्या ३५ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २३ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर, तर ३ जणांची अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: A new patient of Corona; Death of one