कोरोनाचा नवा एक रुग्ण ; एक बरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:35 IST2021-08-17T04:35:17+5:302021-08-17T04:35:17+5:30

जिल्ह्यात सोमवारी रॅपिड अँटिजन तपासणीत हिंगोली परिसरात ७४, सेनगाव ९, औंढा २६, वसमत ५४, कळमनुरी परिसरात ४४ जणांची तपासणी ...

A new patient of Corona; A cure | कोरोनाचा नवा एक रुग्ण ; एक बरा

कोरोनाचा नवा एक रुग्ण ; एक बरा

जिल्ह्यात सोमवारी रॅपिड अँटिजन तपासणीत हिंगोली परिसरात ७४, सेनगाव ९, औंढा २६, वसमत ५४, कळमनुरी परिसरात ४४ जणांची तपासणी केली. यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही, तर हिंगोली परिसरात ६६, सेनगाव परिसरात ५० जणांची आरटीपीसीआर तपासणी केली असता हिंगोली परिसरात आठरवाडी येथे एक रुग्ण आढळून आला. तसेच हिंगोली येथील नवीन कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारा एक रुग्ण बरा झाल्याने त्यास घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १६ हजार २० रुग्ण आढळले. त्यापैकी १५ हजार ६१६ रुग्ण बरे झाले. तसेच आजपर्यंत ३९० रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

Web Title: A new patient of Corona; A cure