नवा एक कोरोना रुग्ण; तीन बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST2021-07-14T04:34:29+5:302021-07-14T04:34:29+5:30

जिल्ह्यात रॅपिड अँटिजनच्या हिंगोलीत ६६, सेनगाव १४४, औंढा ३२, वसमत ९३, कळमनुरी ५७५ अशा ९१० चाचण्यांत एकही बाधित आढळला ...

A new corona patient; Three heals | नवा एक कोरोना रुग्ण; तीन बरे

नवा एक कोरोना रुग्ण; तीन बरे

जिल्ह्यात रॅपिड अँटिजनच्या हिंगोलीत ६६, सेनगाव १४४, औंढा ३२, वसमत ९३, कळमनुरी ५७५ अशा ९१० चाचण्यांत एकही बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात २ पैकी मंगळवाऱ्यात एक बाधित आढळला, तर औंढ्यात ५ व कळमनुरीत ६ पैकी एकही बाधित नाही. या चाचण्यांचे प्रमाण घटत चालले आहे. आज बरे झालेल्या तिघांना नवीन कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ९५८ रुग्ण आढळले. यापैकी १५५५९ जण बरे झाले; तर ३८४ जणांचा मृत्यू झाला. सध्या १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ८ जण गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवले आहे. तर दोघांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: A new corona patient; Three heals