जितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:48+5:302021-07-31T04:29:48+5:30
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची बदली पुणे येथे महिला व बालकल्याणच्या आयुक्त पदावर झाली होती. तर हिंगोलीला कल्याण येथून महावितरणचे ...

जितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची बदली पुणे येथे महिला व बालकल्याणच्या आयुक्त पदावर झाली होती. तर हिंगोलीला कल्याण येथून महावितरणचे संचालक जी.एम. बोडके यांची जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती. मात्र बोडके हिंगोलीला येण्यास इच्छुक नव्हते. तर जयवंशी यांनी पुणे येथे जाण्याची तयारी केली असतानाच आता त्यांची नियुक्ती अकोला येथे बियाणे महामंडळाच्या संचालक पदावर झाली आहे. तर अकोला जिल्हाधिकारी असलेल्या जितेंद्र पापळकर यांना आधी तेथेच मनपा आयुक्तपदी नियुक्ती दिली होती. ती बदलून आता त्यांना हिंगोली जिल्हाधिकारी म्हणून नवी नियुक्ती दिली आहे. मागील काही दिवसांपासून पापळकर यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरीही जयवंशी हेच येथे कायम राहतील, अशीही चर्चा रंगत होती. त्यांना पालकमंत्र्यांसह काही लोकप्रतिनिधींनी हिरवी कंदील दाखविला होता. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चाही आता मागे पडली होती. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा पापळकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे निश्चित दिसत होते. त्यानुसार हा बदल झाल्याचे दिसत आहे.