शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
4
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
5
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
6
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
7
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
8
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
9
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
10
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
11
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
12
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
13
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
14
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

कोथळजच्या नाथजोगींचा सोमवार पालावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 11:31 AM

मुले चोरणारे समजून धूळे जिल्ह्यात पाच जणांची हत्या झाल्यानंतर राज्यभरातील भटक्या समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देहिंगोलीपासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या कोथळज येथे मोठ्या संख्येने हा नाथजोगी समाज आहे.

- दयाशिल इंगोलेहिंगोली : मुले चोरणारे समजून धूळे जिल्ह्यात पाच जणांची हत्या झाल्यानंतर राज्यभरातील भटक्या समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. या दहशतीपोटीच हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील नाथजोगी समाजातील एकही जण सोमवारी भिक्षुकीसाठी बाहेर पडला नाही. 

हिंगोलीपासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या कोथळज येथे मोठ्या संख्येने हा नाथजोगी समाज आहे. जवळपास ९० घरे असून लोकसंख्या ४०० च्या घरात आहे. सात ते आठ कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला असून इतर इतर सर्व झोपड्या करून वास्तव्यास आहेत. भूमिहीन असल्यामुळे भिक्षुकी हेच त्यांच्या उपजिविकेचे साधन आहे. सोमवारी सकाळपासून धुळ्यातील घटनेचीच चर्चा येथे सुरू होती. भयभीत होऊन सर्वजण एकत्र मंदिर परिसरात कुटुंबियांसमवेत जमले होते.

सोमवारी नाथजोगी समाजातील एकही माणूस भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडला नाही. शहरासह ग्रामीण भागातही भिक्षा मागणाऱ्यांकडे संशयीतरित्या पाहिले जात आहे. ‘परत गावात दिसू नकोस’ असा दमही दिला जात आहे, असे हे समाजबांधव सांगत होते. प्रशासनाने भटक्या समाजबांधवांवर होणारा अन्याय दूर करावा अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. जिल्ह्यात सांगवी, सिद्धेश्वर, अंजनवाडा, औंढानागनाथ, गोळेगाव, माथा, वगरवाडी आदी ठिकाणी हा नाथजोगी समाज वास्तव्यास आहे. 

मुले शिक्षणाच्या प्रवाहातकोथळज येथील नाथजोगी समाजातील ६५ मुले शिक्षणाच्या प्रवाहात आल आहेत. ही मुले सध्या हिंगोली येथील वस्तीगृहात राहतात. समाजबांधवांचे मतदान यादीत नाव आहे, परंतु शासनाच्या विविध विकासात्मक योजनांपासून ते कोसो दूर आहेत. मोजक्याच लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. 

मोर्चा काढण्यात येईल धुळ्यातील घटनेचा राज्यस्तरीय संघटनेतर्फे निषेध केला जाणार आहे. हिंगोली येथे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले जाणार असून मोर्चाही काढण्यात येणार आहे. - आप्पा काशिनाथ शिंदे, रा. कोथळज  जि. हिंगोली.

कुटुंब चिंताग्रस्त अफवेमुळे होणाऱ्या हत्या घृणास्पद आहेत. भिक्षा मागण्यासाठी घराबाहेर पडताना कुटुंब चिंताग्रस्त होत आहे. शहराकडे कामानिमित्त गेलल्या युवकाला  थोडाही उशिर झाला  तर काळजाचा ठोका चूकतो आहे. - बाबासिध्दू शितोळे, कोथळज जि. हिंगोली

टॅग्स :Child Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाHingoliहिंगोलीSocialसामाजिक