नांदापुरात तापाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:04 IST2018-03-12T00:04:44+5:302018-03-12T00:04:47+5:30
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून लहान मुलांमध्ये तापीची व गालफुगीचे रुग्णात वाढ झाली आहे. येथे वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

नांदापुरात तापाची साथ
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदापूर : कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून लहान मुलांमध्ये तापीची व गालफुगीचे रुग्णात वाढ झाली आहे. येथे वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. नांदापूर येथे प्राथमिक उपकेंद्रामध्ये डॉक्टर व कर्मचारी हजर राहत नाहीत तरी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून वैद्यकीय विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. जखमीच्या रुग्णांना उपचारासाठी सुविधा उपलब्ध नाही, उपकेंद्र असून कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.