गारखेडा येथील २४ जणांची नावे मतदार यादीतून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:57+5:302020-12-29T04:28:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सेनगाव : तालुक्यातील गारखेडा येथील मतदार यादीतून २४ जणांची नावे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ...

गारखेडा येथील २४ जणांची नावे मतदार यादीतून गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील गारखेडा येथील मतदार यादीतून २४ जणांची नावे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.
सेनगाव तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये पुढाऱ्यांकडून आपल्या वार्डातील मतदार याद्यांची तपासणी करून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच दरम्यान तालुक्यातील गारखेडा ग्रामपंचायतीमध्ये वार्ड क्र. १मधील मतदार यादीतील २४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. आधीच्या यादीमध्ये या २४ मतदारांचा सामावेश होता. परंतु आजघडीला या मतदार यादीची पडताळणी केल्यानंतर संबंधित २४ व्यक्तींची नावे गायब झाल्यामुळे गारखेडा येथील मतदारांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे येथील अरुण अशाेक पाटील यांनी या २४ जणांची नावे आताच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यांनी जिल्हाधिकारी, हिंगोली यांना निवेदन देऊन या प्रकाराची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.