शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने पतीचा खून; पत्नी आणि प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 19:36 IST

मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला; पत्नी व प्रियकराविरुध्द बाळापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

आखाडा बाळापूर ( हिंगोली) : अनैतिक संबंधापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने काटा काढल्याची घटना आखाडा बाळापूर येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नी व प्रियकराविरुद्ध बाळापुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथील शेख शकील शेख खाजा (वय 35 वर्ष ) याचा मृतदेह मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बायपास रोडच्या कडेला आढळून आला होता. ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड, जमादार नागोराव बाभळे, चव्हाण रात्रीच घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची माहिती नातेवाईकांना देऊन ओळख पटविण्यात आली. आज शवविच्छेदन करण्यात आले. यात खून झाल्याचे पुढे आले. 

दरम्यान, मयत शेख शकील याची बहीण यास्मिन शेख वसीम हिने आज बाळापूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. तक्रारीनुसार मयत शकील याची पत्नी फुलमा हिचे व डोंगरकडा येथील इसम मोहसीन याचे अनैतिक संबंध होते. यापूर्वी देखील शकीलला मोहसीनने मारहाण केली होती. त्यावेळी पत्नीने पोलिसात तक्रार देऊ दिली नाही. त्यानंतर फुलमा व शकील हे अर्धापूर येथे राहावयास गेले. काल सकाळी शकील आईला भेटण्यासाठी बाळापूर येथे आला होता. त्यानंतर रात्री शकीलचा खून झाला. पत्नी आणि प्रियकराच्यामध्ये अडथळा ठरत असल्यानेच माझ्या भावाचा खून केला असल्याची तक्रार बहिणीने दिली आहे. त्यानुसार यास्मिन शेख हिच्या तक्रारीवरून मयताची पत्नी फुलमा शेख शकील ( रा. आखाडा बाळापुर,ह.मु. अर्धापूर) व तिचा प्रियकर मोहसीन (राहणार डोंगरकडा )यांचे विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 302 , 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली