सवना येथील खून प्रकरणाचा तपास लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST2020-12-25T04:24:33+5:302020-12-25T04:24:33+5:30
२४ डिसेंबर राेजी मयताचे वडील गजानन भास्करराव नायक हे आपल्या शेतात फेरी मारण्यासाठी गेले असताना त्यांना पिंपरी ...

सवना येथील खून प्रकरणाचा तपास लागेना
२४ डिसेंबर राेजी मयताचे वडील गजानन भास्करराव नायक हे आपल्या शेतात फेरी मारण्यासाठी गेले असताना त्यांना पिंपरी वायचाळ रस्त्यावरील गट नं. ४४८ च्या शेतात रक्ताने माखलेल्या पांढऱ्या रंगाच्या हातरुमालासह काही अंतरावर देशी दारूच्या चार ते पाच रिकाम्या बाटल्या, चिवड्याची रिकामी पाॅकिटे आढळून आली. यानंतर त्यांनी पोलीस पाटील विजय बेंद्रे यांना कळविले असता, त्यांनी कन्हेरगाव चौकी पोलिसांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. रात्री ७ वाजेच्या दरम्यान स्थागु शाखेचे पाेनि उदय खंडेराय, घेवार, कांबळे, उंबरकर यांनी भेट देत पाहणी केली. या शेतातील सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. शेतात सांडलेले रक्त आणि रक्ताने माखलेल्या हातरुमालासह त्या जागेवरील माती व इतर वस्तू पाेलिसांनी तपासासाठी घेतल्या आहेत. या वस्तूंच्या आधारे खून प्रकणातील धागेदोरे जुळून पोलिसांना तपासात मदत होईल. सवना येथील खुनाच्या प्रकरणाचा छडा लावण्याचे पाेलिसांसमाेर आव्हान उभे ठाकले आहे.
फाेटाे नं २८