मुंबई, हैदराबाद रेल्वेला आरक्षण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST2021-03-27T04:30:43+5:302021-03-27T04:30:43+5:30
हिंगोली रेल्वे स्थानकातून नरखेड ते काचीगुडा ही इंटरसिटी एक्स्प्रेस गाडी रोज धावते. सध्यातरी मुंबई व हैदराबाद या ...

मुंबई, हैदराबाद रेल्वेला आरक्षण नाही
हिंगोली रेल्वे स्थानकातून नरखेड ते काचीगुडा ही इंटरसिटी एक्स्प्रेस गाडी रोज धावते. सध्यातरी मुंबई व हैदराबाद या दोन्ही रेल्वे गाड्यांना वेटिंग नाही. सहजरीत्या तिकीट मिळत आहे. नांदेड ते निजामोद्दीन ही रेल्वेगाडी आठवड्यातून एकदा शुक्रवारी हिंगोली स्थानकावर येते. या गाडीलापण मोजकेच प्रवासी पहायला मिळतात. कोल्हापूर ते नागपूर ही रेल्वे गाडी काही दिवसांपूर्वी प्रवाशांच्या मागणीवरुन सुरु करण्यात आली आहे. ही रेल्वे आठवड्यातून मंगळवार आणि शनिवारी दोन वेळेस अशी धावते. कोरोना महामारीमुळे प्रवाशांनी प्रवास करणे टाळल्याचे सध्या तरी पहायला मिळत आहे. १७ डबे असलेल्या नरखेड ते काचीगुडा रेल्वेत जेमतेम अडीच हजार प्रवासी असावेत.
परीक्षेनंतर रेल्वे गाडीला काहीच गर्दी नाही
एप्रिल महिना हा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा कालावधी असतो. परीक्षा संपल्यानंतर तरी रेल्वेला गर्दी राहील, असे वाटले होते. परंतु, सर्व परीक्षा ऑनलाईन होत असल्याने आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रेल्वेला काहीच गर्दी दिसत नाही. एरव्ही गर्दीने हाऊसफुल्ल राहणारे रेल्वेस्टेशन आजमितीस तरी सुनेसुने पहायला मिळत आहे. यातच रेल्वे विभागाने प्लॅटफाॅर्म तिकीट १० रुपयांवरुन आता ३० रुपये केल्याने जाणारे पण रेल्वे स्टेशन स्थानकात विनाकारण जात नाहीत.