शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा PSI होताच शेतकरी आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: July 6, 2023 17:51 IST

MPSC Result: मुलगा ‘साहेब’ झाला या आनंदात शेतकरी आई-वडिलाने घरोघरी जावून पेढे वाटले.

- राजकुमार देशमुखसेनगाव: ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ या उक्तीप्रमाणे जिद्द व मेहनत असेल तर कोणतेही काम साध्य होते. एक दिवस आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे असे म्हणून रवींद्र चव्हाण याने अभ्यास करुन ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण करुन पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) उत्तीर्ण केली. रवींद्र ‘पीएसआय’ परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे कळताच गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढत पेढे वाटण्यात आले.

सेनगाव तालुक्यातील बोरखेडी (पिनगाळे) या गावचा रवींद्र चव्हाण असून शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. रवींद्र प्रकाश चव्हाण याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत झाले. त्यानंतर आठवी ते बारावीपर्यचे शिक्षण परभणी येथील भारत भारती विद्यालयात झाले. रवींद्रच्या घरची परिस्थिती हलाखीची असून वडीलही कमी शिकलेले आहेत. त्यामुळे शिक्षणाचा वारसा तसा घरात म्हणावा तेवढा नाही. परंतु मोठे व्हायचे म्हणून रवींद्र चव्हाण याने शिक्षणाला अधिक महत्व दिले. २०१८ पासून तो पूणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले. यामुळे रवींद्रचे ‘पीएसआय’ होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. या परीक्षेत त्यास ३९१ गुण मिळाले आहेत.

आई-वडिलांच्या डोळ्यांत आले पाणी...प्रकाश चव्हाण यांना सात एकर जमीन असून दोन भाऊ आणि दोन मुले आहेत. यापैकी एकाने ‘एमपीएससी’ परीक्षेत यश मिळविले असून दुसरा मुलगाही पोलिस भरतीची तयारी करु लागला आहे. मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाल्याची बातमी कळताच आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कष्टाचे चिज झाले आहे, असे म्हणत आई-वडिलांनी देवाचे आभार मानले. गावकऱ्यांनी रवींद्र व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार केला. तसेच गावात डिजेे लावून मिरवणूक काढली.

शेतकऱ्याचा मुलगा ‘साहेब’ झाला...महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक-२०२० परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. ही बातमी बोरखडी (पिनगाळे) गावात पोहोचताच मित्र परिवार, गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. शेतकऱ्याचा मुलगा ‘साहेब’ झाला या आनंदात आई-वडिलाने घरोघरी जावून पेढे वाटले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाHingoliहिंगोलीEducationशिक्षणPoliceपोलिस