टाळेबंदीतही हिंगोलीकरांचे फिरणे थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST2021-03-04T04:56:46+5:302021-03-04T04:56:46+5:30
२० फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दोन आकड्यांनी वाढू लागले आहेत. हे पाहून जिल्हाधिकारी जयवंशी यांनी जिल्ह्यात टाळेबंदीचा आदेश काढला ...

टाळेबंदीतही हिंगोलीकरांचे फिरणे थांबेना
२० फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दोन आकड्यांनी वाढू लागले आहेत. हे पाहून जिल्हाधिकारी जयवंशी यांनी जिल्ह्यात टाळेबंदीचा आदेश काढला आहे. तरीही लोकांचे फिरनेही काही संपत नाही असेच दिसत आहे. २ मार्च रोजी नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत हरण चौकातील दोन मटन शॉपला २ हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्या ९ लोकांवर कार्यवाही करत त्यांच्याकडून दंडापोटी १८०० रुपये वसूल केले.मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख बी. के. राठोड, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, डी. पी. शिंदे, पंडित मस्के, प्रवीण चव्हाण, नागेश नरवाडे यांनी ही कार्यवाही केली.
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने नागिरकांनी काम असेल तर बाहेर पडावे, बाहेर पडतेवेळेस मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, स्वत:बरोबर इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.