पहिल्या अपत्यासाठी मातांना मिळणार ५ हजार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:03+5:302021-09-03T04:30:03+5:30
हिंगोली : प्रधानमंत्री मातृवंदना योजना १ जानेवारी २०१७ रोजी सुरू झाली असून आतापर्यत या २७ हजार ६५७ मातांनी या ...

पहिल्या अपत्यासाठी मातांना मिळणार ५ हजार !
हिंगोली : प्रधानमंत्री मातृवंदना योजना १ जानेवारी २०१७ रोजी सुरू झाली असून आतापर्यत या २७ हजार ६५७ मातांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंतर्गत १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरदरम्यान सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहाचे उद्घाटन १ सप्टेंबरला करण्यात आले. शहरातील कल्याण मंडपम् येथे झालेल्या कार्यक्रमात या योजनेबाबत मातांना माहिती देण्यात आली. गरोदर मातांना पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. पहिला हप्ता हा १ हजार रुपयांचा असणार असून दुसरे दोन हप्ते हे दोन, दोन हजार रुपयांचे असणार आहेत. ज्या महिला शासकीय सेवेत आहेत, अशा महिला सोडून इतर महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, असेही आरोग्य विभागाने सांगितले.
तीन टप्प्यांत मिळणार पैसे...
मातृवंदना योजनेअंतर्गत मिळणारे ५ हजार रुपये हे तीन टप्प्यांत दिले जाणार आहेत. महिलेची नोंदणी झाली त्यावेळी १ हजार रुपये, नोंदणीनंतरच्या तीन महिन्यांत २ हजार रुपये आणि बाळाच्या जन्मानंतर ९० दिवसांनी तिसरा हप्ता हा २ हजार रुपयांचा देण्यात येणार आहे.
पात्रतेचे निकष...
मातृवंदना योजनेसाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. मातेने प्रथम आशा वर्कर यांच्याकडे नोंदणी करावी. गर्भवती माता ही शासकीय योजनेत कार्यरत नसावी. इतर महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
लाभासाठी कोठे करायचा अर्ज...
आपल्या परिसरात आशा वर्कर यांच्याकडे मातृवंदना योजनेसंदर्भात विचारणा करावी. काही अडचण आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. आशा वर्कर सांगतील त्याप्रमाणे त्यांना मातांनी माहिती द्यावी.
प्रतिक्रिया...
प्रधानमंत्री मातृयोजना ही १ जानेवारी २०१७ पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २७ हजार ६५७ मातांनी लाभ घेतला आहे. दुसरे म्हणजे योजनेअंतर्गत मातृवंदना सप्ताहही सुरू करण्यात आला आहे. या योजनेमुळे कुटुंबाचा आर्थिक भुर्दंड कमी झाला आहे.
- डॉ. सचिन भायेकर, जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी
डमी नंबर ११२७