शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतातून परतणारे मायलेक दुचाकीसह पुरात वाहून गेले; आईचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:18 IST

मुलगा बचावला, तर नंदगाव तांडा शिवारात सापडला महिला शेतकऱ्याचा मृतदेह

- गजानन वाखरकर

औंढा नागनाथ:  जोरदार पावसामुळे हिंगोली रोडवरील नाल्याला पूर आला असताना दुचाकीने पुल पार करणे जीवघेणे ठरले ठरले आहे. जांभरून शिवारातील शेतातून भोसी गावात परताना दुचाकीवरील मायलेक पुराच्या पाण्यात वाहून गेले. यात मुलगा बचावला असून आज सकाळी महिला शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. 

तालुक्यातील भोसी येथील महिला कोंडाबाई बाबुराव चिभडे (४९) मंगळवारी मुलगा मनोहर सोबत जांभरून शिवारातील शेतात गेल्या होत्या. तेथील कामे आटोपून दोघेही सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान दुचाकीवरून गावात परतत होत्या. दरम्यान, जोरदार पावसामुळे गावाजवळील नाल्याला अचानक पूर आला. पाण्याचा अंदाज न आल्याने पुलावरून जात असताना दोघेही दुचाकीसह वाहून गेले. मुलगा मनोहर कसाबसा बाहेर आला. मात्र,  कोंडाबाई पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. रात्री शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत.  

दरम्यान, आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास नंदगाव तांडा शिवारात कोंडाबाई यांचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरगुडे, जमादार बापूराव चव्हाण, जमादार गजानन गिरी यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी मृतदेह औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :floodपूरHingoliहिंगोलीRainपाऊस