तीन एटीएममध्ये छेडछाड करून पैसे लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST2021-06-20T04:21:01+5:302021-06-20T04:21:01+5:30

हिंगोली शहरात देवडा नगर, शिवाजी नगरातील चित्रा कलर लॅब तसेच नवीन मोंढा परिसरात भारतीय स्टेट बँकेेचे एटीएम मशीन बसविण्यात ...

Money laundered by tampering with three ATMs | तीन एटीएममध्ये छेडछाड करून पैसे लांबविले

तीन एटीएममध्ये छेडछाड करून पैसे लांबविले

हिंगोली शहरात देवडा नगर, शिवाजी नगरातील चित्रा कलर लॅब तसेच नवीन मोंढा परिसरात भारतीय स्टेट बँकेेचे एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. १८ जून रोजी पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेच्या सुमारास काही चोरट्यांनी एटीएम मशीनची चोरी करण्याच्या उद्देशाने तिन्ही एटीएममध्ये प्रवेश केला. यावेळी एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून एटीएम मशीनमधील एकूण रकमेपैकी ४६ हजार ५०० रुपयांची रक्कम काढून घेतली. एटीएम मशीनची छेडछाड करून रक्कम काढून घेतल्याचे समजताच याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर ईपीएस या खासगी कंपनीचे अंकुश भगवानराव हुलेकर (रा. टाकळी कुंभकर्ण) यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोेंद झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. राजू जाधव करीत आहेत.

Web Title: Money laundered by tampering with three ATMs