शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र संचालकांना मंत्र्यांचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:33 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार अपात्र संचालकांना सहकार व पणन मंत्र्यांनी दिलासा दिला असून अपात्रतेच्या कारवाईला अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार अपात्र संचालकांना सहकार व पणन मंत्र्यांनी दिलासा दिला असून अपात्रतेच्या कारवाईला अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघातील संचालक सुमित्रा नरवाडे, अमोल हराळ, संजय देशमुख, गोदावरी बाबाराव शिंदे यांच्याविरोधात संचालक दत्तराव टाले यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अपील केले होते. सदर संचालक विद्यमान ग्रा.पं.चे सदस्य नाहीत. त्यामुळे त्याचे पद रद्द करावे, अशी तक्रार होती. यासंबंधी जिल्हा उपनिबंधक यांनी सुनावणी घेवून ग्रा.प.मतदार संघातील चारही संचालकाना अपात्र घोषित केले होते. या विरोधात अपात्र संचालकांनी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे आव्हान दिले होते. पंरतु या ठिकाणी सदर संचालकांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे अपात्र संचालकांनी राज्य शासनाचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे दाद मागितली होती. या अपिलावर सहकारमंत्र्यांनी २ मे रोजी सुनावणी घेवून सदर अपिलाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत संचालक सुमित्रा नरवाडे, अमोल हराळ, संजय देशमुख, गोदावरी शिंदे यांच्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती दिली. तसे आदेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले असून अंतिम निर्णय लागपर्यंत किमान चारही संचालक पदावर कायम राहणार आहेत.काँग्रेसच्या संचालकासाठी मुटकुळे यांचे प्रयत्नयेथील बाजार समितीच्या चार संचालकांवर अपात्रतेची कारवाई झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे जि.प.चे. सभापती संजय देशमुख, माजी जि.प.सदस्य चंद्रकांत हराळ यांचे चिरंजीव, माजी पं. स. सदस्य बाबाराव शिंदे यांच्या पत्नी हे तीन तर भाजपच्या सुमित्रा नरवाडे अशा चार संचालकांचा समावेश होता. या चारही संचालकांना दिलासा देण्यासाठी सुरवातीपासूनच आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पडद्यामागून बरेच प्रयत्न केले. त्या प्रयत्नातूनच सहकारमंत्र्यांनी चार संचालकांना दिलासा दिला. काँग्रेसच्या संचालकासाठी भाजपच्या आमदाराने प्रयत्न केल्याने सहकाराचे राजकारण कुणाच्या फायद्याचे ठरणार? असा प्रश्न उभा होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी