शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या; हिंगोली दौऱ्यात कारला भरधाव टेम्पोची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 14:35 IST

Minister Varsha Gaikwad accident News : प्रसंगावधान राखून मंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देमंत्री गायकवाड यांच्या वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग किंचित घासल्या गेला. सुदैवाने अपघातात कोणालाही इजा झाली नाही. 

हिंगोली : शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली  जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला एका पिकअप टेम्पोची धडक बसल्याची घटना शहरातील पिपल्स बँकेजवळ १० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. यात पालकमंत्र्यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड ९ जुलैपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती, कोरोना स्थितीचा आढावा व कृषी विभागाची आढावा बैठक झाली. ( Minister Varsha gaikwad's car in the convoy was hit by a speeding tempo incident in Hingoli ) 

१० जुलै रोजी सकाळी आकरा वाजता शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा हिंगोलीच्या रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. ताफा पिपल्स बँकेजवळ आला असता याच वेळी मोंढ्यातून भरधाव वेगाने एक पिकअप टेम्पो मुख्य रस्तावर येत होता. काही कळायच्या आत पालकमंत्री गायकवाड यांच्या वाहनावर टेम्पो धडकला. प्रसंगावधान राखून पालकमंत्र्यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवली. यात पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग किंचित घासल्या गेला. सुदैवाने अपघातात कोणालाही इजा झाली नाही. 

घटनेनंतर पोलिसांनी पीकअप टेम्पो चालकास ताब्यात घेतले असून शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी रामलिला मैदानावर पाहणी केली. दरम्यान, दुपारी २ वाजेपर्यंत हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पिक अप वाहनचालकाविरूद्ध गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडAccidentअपघातHingoliहिंगोली