पांगरा शिंदे परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST2021-02-05T07:55:49+5:302021-02-05T07:55:49+5:30

पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, शिरळी, राजवाडी आदी गावांतील नागरिकांनी याबाबत माहिती देताच काही मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पांगरा ...

Mild tremors in Pangra Shinde area | पांगरा शिंदे परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

पांगरा शिंदे परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, शिरळी, राजवाडी आदी गावांतील नागरिकांनी याबाबत माहिती देताच काही मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पांगरा शिंदे व इतर परिसरात पाठविले. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी भूकंपाचे आवाज झाल्याचे मंडळ अधिकाऱ्यांना सांगितले. भूकंपाचा आवाज किती रिश्टर स्केलचा आहे हे मोजण्याचे यंत्र आपल्याकडे नसल्यामुळे ते सांगता येत नाही; पण भूकंपाचे सौम्य धक्के बसले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दोन वर्षांपासून पांगरा शिंदे परिसरात सतत गूढ आवाजाचे धक्के जाणवत आहेत. या गूढ आवाजाचे संशोधन अद्यापही प्रशासनाला करता आले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या भागात जमिनीतून गूढ आवाज निर्माण होऊन भूकंपाचे सौम्य धक्के बसत असताना त्याचे संशोधन लावण्यासाठी प्रशासन स्तरावर कोणतेच प्रयत्न झालेले दिसत नाहीत, असेही ग्रामस्थ सांगत आहेत. वापटी येथील एका घराची भिंत पडल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: Mild tremors in Pangra Shinde area