हिंगोलीतील पुरुषांना महिलांपेक्षा जास्त टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST2020-12-27T04:21:45+5:302020-12-27T04:21:45+5:30
जिल्ह्यात करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब सर्व्हेक्षणात महिलांपेक्षा पुरुषांना जास्त टेन्शन येते हे उघड झाले आहे. महिला या नियमितपणे ...

हिंगोलीतील पुरुषांना महिलांपेक्षा जास्त टेन्शन
जिल्ह्यात करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब सर्व्हेक्षणात महिलांपेक्षा पुरुषांना जास्त टेन्शन येते हे उघड झाले आहे. महिला या नियमितपणे आहार घेतात, व्यसनापासून दूर राहतात आणि त्या झोपही पुरेशी घेतात. त्यामुळे त्यांचा ताण वाढत नाही.
वेळीअवेळी आहार घेणे,जास्तीचा प्रवास करणे, मसाले पदार्थ खाण्यावर भर देणे, मानसिक ताण घेणे, झोप वेळेवर न घेणे, मोबाईल आणि टीव्ही जास्त प्रमाणात पाहणे, शारीरिक व्यायाम न करणे, चिडचिडपणा जास्त करणे, एकाच जागी जास्त बसणे यामुळे पुरुषांचा रक्तदाब जास्त वाढतो.
मसाला पदार्थ टाळावे
ताण कमी करण्यासाठी रोज साडेचार किलोमीटर अंतर चालावे. रोजच्या रोज नियमित व्यायाम करावा. आहारामध्ये मीठ, साखर, मैदा, मसाल्याचे प्रमाण कमी ठेवावे. विशेष म्हणजे वेळेच्यावेळी आहार घ्यावा. त्याचबरोबर जागरण न करता झोप ही पुरेशी घ्यावी. ताण वाढल्यास किंवा अस्वस्थ वाटू लागल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
नियमित आहार गरजेचा
निरोगी जीवनशैलीकरीता संतुलीत आहार घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. सात्वीक आहारामुळे ताण वाढत नाही. ताण कमी करण्यासाठी रोज व्यायाम आवश्यक आहे. तसेच व्यसनापासून दूर रहावे.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी,शल्य चिकित्सक
व्यसनामुळे रक्तदाब वाढतो
वेळीअवेळी जेवण करणे, जास्त प्रमाणात व्यसन करणे, शारीरक श्रमाचा अभाव या मुख्य कारणांमुळे रक्तदाब वाढतो. तेव्हा व्यसनापासून दूर राहणेच गरजेचे आहे.