कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत पुरुष मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:47+5:302021-02-09T04:32:47+5:30
कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी एक किंवा दोन संततीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली जाते. कुटुंब नियोजनासाठी महिला किंवा पुरुष यापैकी ...

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत पुरुष मागे
कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी एक किंवा दोन संततीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली जाते. कुटुंब नियोजनासाठी महिला किंवा पुरुष यापैकी कोणीही एकाने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी महिलांनाच पुढे केले जात असल्याचे मागील अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. २०१९-२० या वर्षात ८ पुरुषांनी तर ५ हजार ६३ महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. या वर्षात ८ हजार ५०७ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. या वर्षात ६० टक्के शस्त्रक्रिया झाल्या.
डिसेंबर २०२० अखेर १ हजार ३४ महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्या. या वर्षात मात्र पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे मात्र पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले. या वर्षात १२ टक्केच शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या वर्षासाठी ८ हजार ५०७ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, १ हजार ३४४ महिलांनीच कुटुंब नियोजनच्या शस्त्रक्रिया करून घेतल्या.
कुुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत २०१९-२० मध्ये ८ पुरुषांनी शस्त्रक्रिया केली होती. २०१९ प्रमाणे २०२० या वर्षात डिसेंबर २०२० अखेर कमीत कमी ५ तरी पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतील असे वाटले होते. परंतु, पुरुषाने मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसंबंधी नोंद केली नाही. वास्तविक पाहता जि. प. आरोग्य विभागाच्या वतीने वर्षभर जनजागृती करण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या वतीने नेहमी जनजागृतीपर कार्यक्रमही घेण्यात आले होते.
- डॉ. शिवाजी पवार, जि.प. आरोग्य
अधिकारी, हिंगोली