विषय समिती सदस्य; २८ रोजी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:25 IST2017-07-18T00:21:02+5:302017-07-18T00:25:16+5:30
परभणी : येथील जिल्हा परिषदेतील ९ विषय समित्यांच्या सदस्यांची २८ जुलै रोजी दुपारी २ वाजता जि.प.च्या सभागृहात निवड करण्यात येणार आहे.

विषय समिती सदस्य; २८ रोजी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ११६२ शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. शेततळ्याच्या कामावर २ कोटी ७५ लाखांचा खर्च झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना जाग्यावरच सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत २०१६-१७ या वर्षात शेतकऱ्यांना ३ हजार शेततळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागानेही गावा-गावात जावून कृषी सहाय्यकांमार्फत मागेल त्याला शेततळे या योजनेचा प्रसार आणि प्रचार केला. याचे फलित म्हणून पूर्णा तालुक्यातून ४१९, पालम २२०, सेलू ४५९, परभणी ७३८, जिंतूर ९८९, मानवत ४३१, गंगाखेड ७३७, पाथरी ५१२, सोनपेठ २९२ असे एकूण ४ हजार ८०५ अर्ज मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यामधून कृषी विभागानेही छाननी करुन ४ हजार ७१७ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर केले. आतापर्यंत यातील पूर्णा तालुक्यात १००, पालम ४३, सेलू ११६, परभणी २१५, जिंतूर ३०५, मानवत १६२, गंगाखेड १४०, पाथरी ४६ आणि सोनपेठ ३५ अशा एकूण ११६२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४२ शेततळ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी कृषी विभागाकडून ३० बाय ३० शेततळ्यासाठी ५० हजार रुपये या प्रमाणे अनुदानही देण्यात येत आहे. त्यामुुळे शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात पावसाच्या पाण्यातून सिंचनाची सोय निर्माण व्हावी, या हेतूने शेततळे घेतले. २०१६-१७ या एका वर्षात ११६२ शेततळे पूर्ण झाले आहेत.यासाठी कृषी विभागाने २ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदानही लाभार्थ्यांना वाटप केले आहे. शेतकऱ्यांनीही या योजनेअंतर्गत शेततळे घ्यावे, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.