स्थायी समितीची बैठक तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:47 IST2018-10-17T00:47:22+5:302018-10-17T00:47:39+5:30
जि.प.च्या स्थायी समितीची बैठक अधिकारी व पदाधिकाऱ्यांतील ताळमेळाच्या अभावाने अखेर तहकूब करावी लागली. त्यामुळे सीईओंनी नंतर विभागप्रमुखांची बैठक घेतली.

स्थायी समितीची बैठक तहकूब
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जि.प.च्या स्थायी समितीची बैठक अधिकारी व पदाधिकाऱ्यांतील ताळमेळाच्या अभावाने अखेर तहकूब करावी लागली. त्यामुळे सीईओंनी नंतर विभागप्रमुखांची बैठक घेतली.
जि.प.च्या मंगळवारी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या बैठकीस फकिरा मुंढे, अजित मगर, दिलीपराव देसाई, संजय कावरखे आदी सदस्य हजर झाले होते. मात्र १ वाजताची बैठक अडीच वाजेपर्यंत सुरूच नसल्याने या सदस्यांनी काढता पाय घेतला. तर काही पदाधिकारीही हजर नव्हते. त्यामुळे कोरमअभावी बैठकच तहकूब करण्याचा निर्णय जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनी जाहीर केला. त्यानंतर सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी विभागनिहाय आढावा घेतला.