लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ फेब्रुवारीला हिंगोलीत येत आहेत. त्या पार्श्वभूमिवर पुतळा समिती पदाधिकाºयांची बैठक व परिसर पाहणी आज झाली.या बैठकीस आ.तान्हाजी मुटकुळे, पुतळा समिती अध्यक्ष माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जि.प.उपाध्यक्ष मिलिंद यंबल, नगरसेवक गणेश बांगर, अशोक नाईक, त्र्यंबक लोंढे, मनोज शर्मा, डॉ.प्रल्हाद शिंदे, सुजय देशमुख, शिवराम सरनाईक आदींची उपस्थिती होती. यावेळी समितीच्या वतीने करावयाच्या तयारीसंदर्भातही चर्चा झाली. विविध प्रकारचे नियोजनही ठरले.
पुतळा अनावरणानिमित्त पदाधिकाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:47 IST