वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST2021-04-17T04:29:20+5:302021-04-17T04:29:20+5:30

या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल, असे ...

Medical students' exams postponed | वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा घेणे धोक्याचे असून त्या पुढे ढकलण्याची मागणी करणारे ट्विट खा. राजीव सातव यांनी केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी याची दखल घेतली व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासनही दिले होते. यासंदर्भात खासदार सातव यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात ट्विटरवरून सूचना मांडली तसेच शासनाला पत्रही दिले होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आता वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा असून राज्यभरातून सुमारे ५० हजारांवर विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत अशा परीक्षा घेणे धोक्याचे आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी खा. सातव यांनी देशमुख यांच्याकडे केली होती. यावर मंत्री देशमुख यांनी या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत कोविडच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर करताना सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले.

Web Title: Medical students' exams postponed