कमाल तापमानात १ ते २ कमाल तापमानात १ ते २ अंशाने वाढ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:00+5:302021-04-18T04:29:00+5:30

हिंगोली: येत्या पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात १.० ते २.० अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘वनामकृ’विद्यापीठाच्या ...

Maximum temperature 1 to 2 Maximum temperature is likely to increase by 1 to 2 degrees | कमाल तापमानात १ ते २ कमाल तापमानात १ ते २ अंशाने वाढ होण्याची शक्यता

कमाल तापमानात १ ते २ कमाल तापमानात १ ते २ अंशाने वाढ होण्याची शक्यता

हिंगोली: येत्या पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात १.० ते २.० अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘वनामकृ’विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने वर्तविला आहे.

उन्हाची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पिकांच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. यामुळे कलमांची हानी होणार नाही, तसेच बागेत खोडाजवळ चांगल्या प्रकारे आच्छादन करावे. केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी. आंबा बागेत ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याची व्यवस्था करावी. मुख्य खोडाजवळ भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील आळ्या काढून नष्ट करणे गरजेचे आहे.

भाजीपाला पिकांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. मिरची, वांगी, भेंडी पिकांमध्ये रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, पायरीप्रॉक्सिफेन ५ टक्के, फेनप्रोपाथ्रीन १५ टक्के दहा मिली किंवा डायमेथोएट ३० टक्के १३ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, जेणेकरून सर्व पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ होईल.

शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी

येत्या २१ ते २७ एप्रिलदरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांसोबत इतर उन्हाळी पिकांची काळजी घ्यावी. गरज पडल्यास ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य प्रकल्प समन्वयक डाॅ.कैलास डाखोरे यांनी केले आहे.

Web Title: Maximum temperature 1 to 2 Maximum temperature is likely to increase by 1 to 2 degrees