कमाल, किमान तापमान सरासरीएवढेच राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:12+5:302021-09-03T04:30:12+5:30

ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनिल ५ टक्के ...

The maximum, minimum temperature is likely to be above average | कमाल, किमान तापमान सरासरीएवढेच राहण्याची शक्यता

कमाल, किमान तापमान सरासरीएवढेच राहण्याची शक्यता

ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनिल ५ टक्के ३० मि.लि. किंवा स्पिसेटोरम ११.७ टक्के ८ मि.लि. किंवा बूप्रोफेंझीन २५ टक्के २० मि.लि. किंवा फलोनिकॅमिड ५० टक्के ६० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापसात फूलगळ दिसून येत असल्यास नॅपथेलीन ॲसिटिक ॲसिड २.५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

दमट वातावरणामुळे तूर पिकावरही अळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. अळीचा नायनाट करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के १६ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहनही विद्यापीठाने शेतकऱ्यांंना केले आहे.

Web Title: The maximum, minimum temperature is likely to be above average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.