शिवजयंतीनिमित्त महिला व मुलींसाठी मॅरेथॉन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST2021-02-14T04:27:41+5:302021-02-14T04:27:41+5:30
ही मॅरेथॉन स्पर्धा छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळ्यापासून सकाळी सुरू होणार आहे. पोस्ट ऑफिस रोड, आखरे मेडिकल, जवाहर रोड, महात्मा ...

शिवजयंतीनिमित्त महिला व मुलींसाठी मॅरेथॉन स्पर्धा
ही मॅरेथॉन स्पर्धा छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळ्यापासून सकाळी सुरू होणार आहे. पोस्ट ऑफिस रोड, आखरे मेडिकल, जवाहर रोड, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, अग्रसेन महाराज चौक, जुनी जिल्हा परिषद रोड, महाराष्ट्र ग्रामीण बँक ते छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळ्याजवळ या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३ हजार, तृतीय पारितोषिक २ हजार रुपये व प्रोत्साहनपर पारितोषिक १ हजार आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह तसेच मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा केवळ महिला व मुलींसाठी असून, या स्पर्धेत जास्तीतजास्त महिला व मुलींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मॅरेथॉन समितीच्या प्रमुख ज्योती वाघमारे, सदस्या ज्योती वाढवे, ज्योती धुळे, वंदना सावळे, सोनी शेळके, दीपा डिगे, शीतल बेंद्रे, सुरेखा लोखंडे, वैशाली खरटमल, दामिनी भुमरे, संजीवनी मस्के यांनी केले आहे.