मराठा सेवा संघ वर्धापन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST2021-09-02T05:04:13+5:302021-09-02T05:04:13+5:30
हिंगाेली : मराठा सेवा संघाच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी 1 सप्टेंबर राेजी येथील शासकीय विश्रामगृहात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात ...

मराठा सेवा संघ वर्धापन दिन उत्साहात
हिंगाेली :
मराठा सेवा संघाच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी 1 सप्टेंबर राेजी येथील शासकीय विश्रामगृहात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणाऱ्या महिला-पुरुषांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढाेकर पाटील, तर प्रमुख उपस्थिती म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनाेज आखरे, खंडेराव सरनाईक, ज्येष्ठ पत्रकार तुकाराम झाडे, प्रा. डी.एन. केळे यांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊंचे पूजन करून संगीतसूर्य केशवराव भाेसले सांस्कृतिक परिषदेच्या वतीने जिजाऊ वंदना गायली गेली. या कार्यक्रमात बाेलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनाेज आखरे म्हणाले की, मराठा सेवा संघाने गेल्या 31 वर्षांत समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. वैचारिक क्रांती घडवून महाराष्ट्रतील जातीय दंगली कमी झाल्या आहेत. महापुरुषांच्या विचाराने चालणाऱ्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ह्या संघटना आहेत. सेवा संघाच्या माध्यमातून बहुजनांचा खरा इतिहास मांडण्यात आला आहे, असेही आखरे म्हणाले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला-पुरुषांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सह्यादी हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. यशवंत पवार, डाॅ. स्वाती पवार, काेराेना याेद्धा प्रतिनिधी म्हणून डाॅ. नामदेव काेरडे, सेवा सदन वसतिगृहाच्या संचालिका मीरा कदम, गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविलेल्या उमा जगताप, तर कस्तुरी मंच पुणेद्वारा लाेणावळा येथे आयाेजित श्रावण सम्राज्ञी साैंदर्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या दिव्यजा कल्याणकर यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर लाेंढे, प्रास्ताविक पंडित अवचार, तर आभार माधव जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाला संगीतसूर्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. जयप्रकाश पाटील, जगद्गुरू तुकाेबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुधाकर इंगाेले, सुनीता मुळे, वंदना आखरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा राजश्री क्षीरसागर, सुधाकर बल्लाळ, डाॅ. संताेष कल्याणकर, नामदेवराव सरकटे, राजकुमार वायचाळ, पंडित शिरसाठ, बाबाराव श्रृंगारे, दिलीप घ्यार, श्याम साेळंके, रमेश चेंडके, विश्वास वानखेडे, हरिभाऊ मुटकुळे आदींची उपस्थिती हाेती.