जलेश्वर तलाव स्वच्छतेसाठी अनेकांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:23 IST2020-12-26T04:23:53+5:302020-12-26T04:23:53+5:30
हिंगोली शहरातील मुख्य भागात असलेला जलेश्वर तलाव हा शहराचे सौंदर्य वाढवतो. या ठिकाणी अनेकजण कचरा टाकून घाण करत आहेत. ...

जलेश्वर तलाव स्वच्छतेसाठी अनेकांचे श्रमदान
हिंगोली शहरातील मुख्य भागात असलेला जलेश्वर तलाव हा शहराचे सौंदर्य वाढवतो. या ठिकाणी अनेकजण कचरा टाकून घाण करत आहेत. यामुळे शहराचे सौंदर्य नष्ट करीत आहे. मात्र नगर परिषद स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. सध्या सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ आणि माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने योग विद्या धामने पुढे येऊन नगर परिषद कर्मचारी यांना सोबत घेऊन जलेश्वर तलाव येथील स्वच्छता करून श्रमदान केले. हिंगोली शहरातील सर्व नागरिकांना स्वच्छतेसाठी आवाहन करण्यात येत आहे.
यावेळी योग विद्या धामचे सर्व साधक व नगर परिषदचे बाळू बांगर, मुंजाजी बांगर, गजानन बांगर, दिनेश वर्मा, विजय शिखरे, माधव सुकते, गोपाल आठवले, रेखा आठवले, चंद्रभान आठवले, शारदा गायकवाड, अशोक चव्हाण, आकाश गायकवाड, चेतन भूजवने, प्रताप भूजवने, अनिल गालफाडे, बाबूराव खरात, सुमित कांबळे, गजानन जगताप, अजय मंडले, करण पडळकर, सागर गडप्पा, शक्ती कांबळे, मनीष दराडे, गणेश बांगर, आकाश गायकवाड आदींचा सहभाग घेतला. फाेटाे नं० ०४