जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अनेक नवे चेहरे उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:54 AM2021-02-06T04:54:33+5:302021-02-06T04:54:33+5:30

सध्या हिंगोली जिल्ह्याचे सहा संचालक आहेत. यात हिंगोलीतून आ.तान्हाजी मुटकुळे, औंढ्यातून ॲड. बाबा नाईक, वसमतमधून आंबादास भोसले, कळमनुरीतून सुरेश ...

Many new faces eager for the district central bank | जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अनेक नवे चेहरे उत्सुक

जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अनेक नवे चेहरे उत्सुक

Next

सध्या हिंगोली जिल्ह्याचे सहा संचालक आहेत. यात हिंगोलीतून आ.तान्हाजी मुटकुळे, औंढ्यातून ॲड. बाबा नाईक, वसमतमधून आंबादास भोसले, कळमनुरीतून सुरेश वडगावकर, सेनगावमधून साहेबराव पाटील गोरेगावकर तर महिलांमधून रूपाली पाटील गोरेगावकर यांनी मागच्या निवडणुकीत बाजी मारली होती. बहुतांश जागा बिनविरोधच झाल्या होत्या.

यावेळीही विद्यमानांपैकी जवळपास सर्वच इच्छुक आहेत. मात्र, काही नवे चेहरेही चाचपणी करताना दिसत आहेत. अजून उघडपणे कोणी समोर आले नाही. मात्र, तयारी सुरू आहे. मुटकुळे हे भाजपचे तर भोसले राष्ट्रवादीचे आहेत. वडगावकर व नाईक त्यावेळी काँग्रेसचे होते. यापैकी वडगावकर आता सेनेचे आहेत. रूपाली पाटील सेनेच्या विद्यमान जि.प.सभापती आहेत, तर साहेबराव पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. मात्र, आता कोण कोणत्या पक्षाशी संगत करून कोणत्या पॅनलमध्ये आघाडी करेल, हे सांगता येत नाही. परभणी जिल्ह्यातील संचालकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तिकडून जी नेतेमंडळी पॅनल तयार करील, त्यात सोयीप्रमाणे हिंगोलीतील नेतेमंडळी जागा मिळवितात की, मागच्याप्रमाणे जो तो आपल्या बळावर बँकेवर जाईल, हे लवकरच कळणार आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.से. सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्थांच्या तालुकानिहाय असलेल्या मतदारसंघात ९४३ मतदारसंख्या आहे. यात हिंगोली ९५, औंढा ६३, वसमत ७८, कळमनुरी ८६, सेनगाव ८२ अशी तालुकानिहाय आकडेवारी आहे, तर उर्वरित परभणी जिल्ह्यातील मतदार आहेत. याशिवाय इतर पाच राखीव मतदारसंघ आहेत. त्यात महिला २, इतर मागस, जाती व जमाती आदींचा समावेश आहे. शेतमाल प्रक्रिया मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प मतदार आहेत. यात हिंगोली १, औंढा १, वसमत ३, कळमनुरी १ असे सहाच मतदार आहेत, तर इतर बिगर शेती मतदारसंघात हिंगोली ३८, सेनगाव २०, औंढा १२, वसमत ३३, कळमनुरी १५ अशी संख्या आहे, तर दोन्ही जिल्ह्यांचे मिळून ५१४ मतदार आहेत. त्यामुळे यात परभणी जिल्ह्याचाच वरचष्मा राहत आला आहे. मागच्यावेळी अंबादास भोसले यांच्या रूपाने जिल्ह्याला बँकेचे उपाध्यक्षपद मिळाले होते. यंदा निवडणुकीनंतरच जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होईल. सध्या न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणुकीची प्रक्रिया ठप्प आहे.

Web Title: Many new faces eager for the district central bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.