एसटीमध्ये १५ टक्के उपस्थितीची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:30 IST2021-05-09T04:30:39+5:302021-05-09T04:30:39+5:30

हिंगोली : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्याचे पाहून शासनाने १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली आहे, परंतु चालक-वाहकांबरोबर जिल्ह्यातील ...

As many as 15 per cent attendance in ST | एसटीमध्ये १५ टक्के उपस्थितीची ऐशीतैशी

एसटीमध्ये १५ टक्के उपस्थितीची ऐशीतैशी

हिंगोली : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्याचे पाहून शासनाने १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली आहे, परंतु चालक-वाहकांबरोबर जिल्ह्यातील तिन्ही आगारांमध्ये इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती अधिक दिसून येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत असे तीन आगार आजमितीस कार्यरत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने, सर्व प्रवासी बसेस बंद केल्या आहेत. १५ टक्के उपस्थिती महामंडळात असायला पाहिजे, असे परिपत्रक महामंडळाला प्राप्त झाले आहे, परंतु असे असतानाही तिन्ही आगारांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाचे नियम पाळले जात आहेत

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचे सर्व नियम महामंडळात पाळले जात असल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. ज्यांना ड्युटी दिली आहे, अशांनीच कामावर यावे, ज्यांना ड्युटी नाही, अशांनी घरीच बसावे, अशाही सूचना दिल्या आहेत. मग कर्मचारी ड्युटीवर का येतात? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया

चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया

कोरोनामुळे प्रवासी बसेस बंद आहेत. अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यास आम्ही कामावर येत आहोत. ड्युटीवर आल्यावर कोरोना नियमांचे पालन करतो.

-गजानन सांगळे, चालक

कोरोना महामारीमुळे १५ टक्के उपस्थितीच्या सूचना दिल्या आहेत, परंतु अधिकाऱ्यांनी ड्युटीवर येण्याच्या सूचना दिल्यासच ड्युटीवर येतो. या दरम्यान, मास्कचा पुरेपूर वापर करतो.

-चंद्रकांत चहाड, वाहक

चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांचे पगारपत्रकाचे काम सध्या सुरू आहे. याचबरोबर, कार्यालयीन कामेही सुरू आहेत. परिस्थिती पाहून चालक, वाहक, यांत्रिक कामगारांना कामावर बोलावून कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

-एस.पी. गोरे, वाहतूक निरीक्षक, हिंगोली

जिल्ह्यातील एकूण ०३

चालक- ३१२

वाहक- ३१५

अधिकारी- ११

यांत्रिक कर्मचारी- ८४

प्रशासकीय अधिकारी- ५६

Web Title: As many as 15 per cent attendance in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.