पत्नीला आणायला गेलेल्या एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST2021-09-10T04:36:35+5:302021-09-10T04:36:35+5:30
याप्रकरणी भीवा शिवदास खंडागळे (रा. बोल्डा) यांच्या फिर्यादीवरून सुरेश गोविंदा कांबळे, संतोष सुरेश कांबळे, नीलाबाई सुरेश कांबळे (तिघे. रा. ...

पत्नीला आणायला गेलेल्या एकास मारहाण
याप्रकरणी भीवा शिवदास खंडागळे (रा. बोल्डा) यांच्या फिर्यादीवरून सुरेश गोविंदा कांबळे, संतोष सुरेश कांबळे, नीलाबाई सुरेश कांबळे (तिघे. रा. बोल्डा) याचेविरूद्ध आखाडा बाळापूर पेालीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. भीवा खंडागळे हे ८ सप्टेंबर रोजी पत्नीस सासरी नेण्यासाठी गेले असता तिघांनी वाद घालून थापडाबुक्क्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पत्नीचीही पतीविरुद्ध तक्रार
याप्रकरणी पत्नीनेही पतीविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून दीक्षा भीवा खंडागळे यांच्या फिर्यादीवरून भीवा शिवदास खंडागळे, सिंधूबाई शिवदास खंडागळे याचेविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. गटाचे पैसे उचलून दे तुम्हाला लागत नाही, या कारणावरून दीक्षा खंडागळे यांना व त्यांच्या वडिलांना लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जावेद करीत आहेत.