सासरवाडीला जाणाऱ्या एकास ऑटोचालकाने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST2021-09-22T04:33:31+5:302021-09-22T04:33:31+5:30

नाशिक येथील जुना सिडको भागातील इंदिरा गांधी वसाहतीत राहणारे मच्छिंद्र सखाराम गवळी हे नाशिक येथून सासरवाडीला बासंबा येथे जाण्यासाठी ...

A man on his way to Sasarwadi was robbed by a motorist | सासरवाडीला जाणाऱ्या एकास ऑटोचालकाने लुटले

सासरवाडीला जाणाऱ्या एकास ऑटोचालकाने लुटले

नाशिक येथील जुना सिडको भागातील इंदिरा गांधी वसाहतीत राहणारे मच्छिंद्र सखाराम गवळी हे नाशिक येथून सासरवाडीला बासंबा येथे जाण्यासाठी हिंगोलीत आले होते. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ते एमएच ३८. १५३६ क्रमांकाच्या ऑटोरिक्षात बसले होते. ऑटोरिक्षात चालकासह अन्य एक जण बसलेला होता. ऑटोरिक्षा अकोला बायपास भागातील एका पेट्रोलपंपाच्या समोर गेला असता ऑटोरिक्षा चालकांने ऑटो थांबवून मच्छिंद्र गवळी यांच्या जवळील बॅग हिसकावून घेतली. तसेच बॅगमधील रोख ३ हजार रुपये व १० हजार रुपये किमतीचा मोबाइल, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पत्नीचे आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मुलाचा जन्म दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रेही काढून घेतली. याप्रकरणी मच्छिंद्र गवळी यांच्या फिर्यादीवरून ऑटोचालक व अन्य एकाविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलीस निरीक्षक मळघणे, पोलीस उप-निरीक्षक के.डी. पोटे, यामावार, पोलीस हवालदार पोकळे, अशोक धामणे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन लुटारू ऑटोचालकांचा शोध घेतला. यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उप-निरीक्षक यामावार करीत आहेत.

Web Title: A man on his way to Sasarwadi was robbed by a motorist