कौठ्याचा मुख्य रस्ता बनला खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:22 IST2021-01-10T04:22:33+5:302021-01-10T04:22:33+5:30
पुसेगाव परिसरातील वळण रस्त्यांवर खड्डे पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव परिसरातील वळण रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना ...

कौठ्याचा मुख्य रस्ता बनला खड्डेमय
पुसेगाव परिसरातील वळण रस्त्यांवर खड्डे
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव परिसरातील वळण रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही वेळेस खड्ड्यांमुळे अपघातही घडत आहेत. संंबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
कर्णकर्कश आवाजाचे प्रमाण वाढले
हिंगोली : शहरातील गांधी चौक, वाशिम रोड, बसस्थानक आदी भागांमध्ये काही दुचाकीचालक हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करीत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना याचा त्रास होत आहे. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी याची दखल घेऊन कर्णकर्कश आवाज कायमचा बंद करावा, अशी मागणी पुढे येत आहे.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापर सुरूच
हिंगोली : शहरात मागील काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढलेला पाहायला मिळत आहे. दुकानदार सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहेत. संबंधित विभागाने प्लास्टिक पिशव्या बंद कराव्यात, अशी मागणी होत आहे.