हिंगोली तालुक्यात ५६ ग्रामपंचायतींवर राहणार महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:13+5:302021-02-05T07:53:13+5:30

हिंगोली : तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींसाठी येथील नगरपालिकेच्या कल्याण मंडपम सभागृहात ३० जानेवारी रोजी सरपंचपदाचे २०२० ते २०२५ या ...

Mahila Raj will be on 56 gram panchayats in Hingoli taluka | हिंगोली तालुक्यात ५६ ग्रामपंचायतींवर राहणार महिलाराज

हिंगोली तालुक्यात ५६ ग्रामपंचायतींवर राहणार महिलाराज

हिंगोली : तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींसाठी येथील नगरपालिकेच्या कल्याण मंडपम सभागृहात ३० जानेवारी रोजी सरपंचपदाचे २०२० ते २०२५ या

कालावधीसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी काही सदस्यांनी जल्लोष केला, तर काही सदस्यांचे चेहरे पडलेले पाहायला मिळाले. एक दिवस आरक्षण सोडत पुढे ढकलल्याने काय फेरबदल होणार, हे ऐकण्यासाठी नूतन ग्रामपंचायत सदस्य, पॅनेलप्रमुख व गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

हिंगोली तालुक्यातील १११ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत २९ जानेवारी रोजी होणार होती; मात्र तांत्रिक कारण पुढे करीत ही सोडत एक दिवसाने पुढे ढकलत ३० जानेवारी रोजी घेण्यात आली. त्यानुसार शनिवारी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीस सुरुवात झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पुढीलप्रमाणे अनुसूचित जाती : हनवतखेडा, कडती, गिलोरी, खानापूर (चि), जोडतळा, इडोळी, ब्रह्मपुरी, कोथळज, समगा. अनुसूचित जाती महिला : अंभेरी, खडकद (बु), माळधामणी, कनका, भांडेगाव, काळकोंडी, खांबाळा, उमरा, वैजापूर. अनुसूचित जमाती : बोराळवाडी, पेडगाव, डिग्रसवाणी, देवठाणा. अनुसूचित जमाती महिला : अंधारवाडी, फाळेगाव, राजूरा, लोहरा. नागरिकांचा मागास प्रवर्ग : घोटा, पिंपळखुटा, बळसोंड, बोराळा, मालवाडी, राहोली (बु.),लिंबाळा (म.), लिंबी, लोहगाव, संतुक पिंप्री, सरकळी, सिरसम (बु), इंचा, दुर्गधामणी, जांबरुण तांडा. नागरिकाचा मागासप्रवर्ग महिला : कनेरगावनाका, कलगाव, चोरजवळा, टाकळी (त. ना.), पिंपळदरी (त. बा.), भटसावंगीतांडा, माळसेलू, लिंबाळा (प्र. वा.), सावरगाव बंगला, आमला, देऊळगाव रामा, कारवाडी, सागद, उमरखोजा, हिवराबेल. सर्वसाधारण : आंबाळा, केसापूर, खेड, खेर्डा, गाडीबोरी, जयपूरवाडी, जांबरुण आंध, नर्सी नामदेव, पहेनी, पांगरी, पातोंडा, बासंबा, भिंगी, भीरडा, माळहिवरा, राहोली (खु), वरुड गवळी, साटंबा, सावा, हिंगणी, कळमकोंडा (बु), आडगाव, जामठी (खु), दाटेगाव, सवड, पारडा, लासीना. सर्वसाधारण महिला : इसापूर, कानडखेडा (बु), कानडखेडा (खु), करंजाळा, खंडाळा, खरबी, डिग्रस (क), चिंचोली, नवलगव्हाण, नांदुरा, पळसोना, पिंपरखेड, पारोळा, बोडखी, बोरजा, बोरी शिकारी, बोंडाळा, वडद, वराडी, वांझोळा, सावरखेडा, हिरडी, येळी, दुर्गसावंगी, बेलुरा, भोगाव, भटसावंगी, चिंचाळा.

यावेळी आरक्षण सोडत ऐकण्यासाठी नूतन ग्रामपंचायत सदस्य व पॅनेलप्रमुख व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Mahila Raj will be on 56 gram panchayats in Hingoli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.