Maharashtra Election 2019 :हिगोली जिल्ह्यात ६३.०६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 05:20 PM2019-10-22T17:20:47+5:302019-10-22T17:21:13+5:30

Maharashtra Election 2019 : मतदार यादीत नाव नसल्याचा गोंधळ

Maharashtra Election 2019 : Hingoli district polls 63.06 % | Maharashtra Election 2019 :हिगोली जिल्ह्यात ६३.०६ टक्के मतदान

Maharashtra Election 2019 :हिगोली जिल्ह्यात ६३.०६ टक्के मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देमतदान शांततेत

हिंगोली : विधानसभेच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, आणि हिंगोली मतदारसंघात शांततेने आणि उत्साहाने मतदान झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६३.०६ टक्के मतदान झाले अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदारसंघातील १ हजार १ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली. वसमत मतदारसंघात ३२२, कळमनुरी मतदार संघात ३४५ आणि हिंगोली मतदार संघात ३३४ मतदान केंद्रावर  शांततेत मतदान झाले. सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदारांचा ओघ कमी होता. सायंकाळी उशिरा वसमत मतदारसंघात ७२.११, कळमनुरीत ६८.६५ तर हिंगोलीत ६१ टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला. पावसामुळे काही भागातील साहित्य येण्यास विलंब होत होता.

सोशल मीडियातून मतदानाचा हक्क बजावावा याबाबत फिरत होते मेसेज
सोशल मीडियातून अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे छायाचित्र पोस्ट करून आपणही मतदान करावे असे आवाहन केले जात होते. नवमतदारांत उत्सुकता दिसून आली. हिंगोली शहरातील विविध बुथवर नवमतदारांच्या रांगाही पाहावयास मिळाल्या. 

मतदार यादीत नावे शोधण्यात वेळ
निवडणूक दरम्यान मतदान करण्यासाठी बुथवर आलेल्या मतदारांना यादीत नाव शोधावे लागले. अनेकांची तर नावेच सापडत नसल्याने त्यात बराच वेळ जात होता. यावेळी बुथवरील कर्मचारी व कार्यकर्ते मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी मदत करताना दिसून आले. ओळखपत्राची चाचपणी केल्यानंतरच मतदान करू देण्यात येत होते.  

पोलीस बंदोबस्त 
निवडणूक दरम्यान मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेत कडेकोट पोलीस बंदोबस्त दिसून आला.

पावसामुळे मतदानावर परिणाम
विधासभा निवडणूक दरम्यान मतदानासाठी जिल्हाभरातील बुथवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लागल्या होत्या. परंतु काही ठिकाणी पाऊस झाल्याने मतदानावर परिणाम झाला. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Hingoli district polls 63.06 %

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.