भगवान महावीर यांनी मानवतेचे संविधान दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:56 AM2018-03-30T00:56:37+5:302018-03-30T00:56:37+5:30

अहिंसेचे प्रणेते भगवान महावीर यांनी जगाला मानवतेचे संविधान दिले आहे. दु:खाचे कारण हिंसा असून हिंसा हा पापाचा समुद्र आहे. पशुहत्या हा अधर्म आहे. अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे, असे उद्गार मुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवाप्रसंगी काढले. यावेळी त्यांनी प्रवचनातून भगवान महावीर यांच्या काळातील स्थिती, परिस्थिती त्यांचा जन्म सत्यधर्म, समिचीन धर्म, महावीरांची नावे, वीर, अतिविर, अन्मती, महावीर इत्यादी नावांची उदाहरणे देऊन महत्त्व सांगितले.

 Lord Mahavir gave constitution of humanity | भगवान महावीर यांनी मानवतेचे संविधान दिले

भगवान महावीर यांनी मानवतेचे संविधान दिले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अहिंसेचे प्रणेते भगवान महावीर यांनी जगाला मानवतेचे संविधान दिले आहे. दु:खाचे कारण हिंसा असून हिंसा हा पापाचा समुद्र आहे. पशुहत्या हा अधर्म आहे. अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे, असे उद्गार मुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवाप्रसंगी काढले. यावेळी त्यांनी प्रवचनातून भगवान महावीर यांच्या काळातील स्थिती, परिस्थिती त्यांचा जन्म सत्यधर्म, समिचीन धर्म, महावीरांची नावे, वीर, अतिविर, अन्मती, महावीर इत्यादी नावांची उदाहरणे देऊन महत्त्व सांगितले.
शोभायात्रेत सर्वांनी स्वच्छता अभियान पाळण्याचे आवाहन केले. भगवान महावीर हे मोहासाठी नाही तर मोक्षासाठी जीवन जगले. १२ वर्षे ५ महिने १५ दिवस तपश्चर्या करुन केवळ ज्ञानाची प्राप्ती त्यांना झाली. प्राणी मात्रांवर दया करा, हिंसा करु नका, जगा आणि जगू द्या, या मुद्यांवर भर दिला. जैन धर्म अत्यंत प्राचीन असून तीर्थंकर हे प्रवर्तक असल्याचे मुनिश्रींनी सांगितले.
गुरुनानक, भगवान गौतम बुद्ध यांनी जैन धर्माच्या तत्त्वांचा प्रसार केल्याचे सांगितले. समर्थ रामदास यांनी प्राणी मात्रावर दया करा, असे विचार दिले, तसेच अहिंसा हाच मानव धर्म असून अहिंसा हा विश्व धर्म असल्यामुळे पशुहिंसा रोखण्यासाठी मदत करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महावीर जयंती निमित्ताने युवती सक्षमीकरण णमोकार महामंत्र, २४ तिर्थकर, भक्तामगर, सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, कळस सजावट इ कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शोभायात्रेत असंख्य भाविकांनी एक सारखी वेशभूषा केली होती. दरम्यान, पंचकल्याणक महोत्सवाच्या पत्रिकेचेही विमोचन समितीच्यावतीने करण्यात आले. यावेळी जीवन मस्के, ढेंबरे, डॉ. राज राठोड, राजेंद्र हलवाई, कैलास श्रीनाथ, भरत चौधरी कन्हैया खंडेलवाल, अ‍ॅड. मनिष साकळे, प्रकाश सोनी, डॉ. प्रेमेंद्र बोथरा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांचा सत्कार केला. यशस्वीतेसाठी सर्व जैन मंदिराचे अध्यक्ष, विश्वस्त, महोत्सव समिती, सर्व ग्रुप मंडळाचे सदस्य, महिला मंडळ महावीर भवन ट्रस्ट व सकल जैन समाजाने परिश्रम घेतले.
ंऔंढा नागनाथ येथे येथे व पिंपळदरी येथे भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त गावातील मुख्य मार्गावरुन काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आकर्षक देखावे करण्यात आले होते. पंचामृत अभिषेक, महापूजा, महाप्रसाद, सायंकाळी आरती, प्रवचन तथा विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होेते. औढा ना. येथे मीना तेजकुमार झांजरी, मंजूषा झांजरी, नंदाबाई झांजरी, किरण झांजरी, निता झांजरी, स्वाती झांजरी, संगीता झांजरी, राखी झांजरी, सपना झांजरी, सुरेश बडजाते, मास्ट, अभिषेक बडजाते, अमृता झांजरी, सतीश हुडेकर, रामभाऊ हुडेकर, विलास हुडेकर, सुकांत संघई, डॉ. विमलकुमार बोरा, पारस जैन, श्रद्धा जैन, पूजा जैन, स्वाती जैन, सुमनबाई जैन तर पिंपळदरी येथे निता महाजन, त्रीशला महाजन, निकीता मुकीरवार, सुनंदा माद्रप, योगिता कंदी, प्रणिता माद्रप, शांताबाई हलगे, समता माद्रप, ओमप्रकाश दोडल, लक्ष्मी हलगे, अपेक्षा यंबल, सुरेखा हलगे, विनोदिनी कंदी, अर्चना हलगे, मधुर महाजन, हेमराज जैन, उज्ज्वल मुक्कीरवार आदी जैन बांधव उत्साहात सहभागी झाले होते.
वसमत : येथे श्री भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त वसमत येथील जैन समाजातर्फे महावीर जैन मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने समाजबांधव, महिला सहभागी होत्या. शहराच्या मुख्य मार्गाने ही शोभायात्रा निघाली. महावीर चौकातील महावीर स्तंभाजवळ ही मिरवणूक पोहोचली. यावेळी भगवान महावीरांचा जयघोष करत समाजबांधवांनी पूजा केली. दिवसभर धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. शोभायात्रेचे स्वागत सभापती सीताराम मानेवार, नगरसेवक सचिन दगडू यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांनी केले. शोभायात्रेत जैन समाजाचे अध्यक्ष चंदूलाल बुजूर्गे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ सहभागी झाले होते.
सेनगाव : भगवान महावीर जयंतीनिमित्त सेनगावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. सेनगाव येथील दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालखी, रथातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महिला ,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Lord Mahavir gave constitution of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.