परभणीमार्गे लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:13+5:302021-07-05T04:19:13+5:30

डेल्टा प्लस व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून परभणी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत २९ जून ते ३ जुलै ...

Long distance buses start parbhani | परभणीमार्गे लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू

परभणीमार्गे लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू

डेल्टा प्लस व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून परभणी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत २९ जून ते ३ जुलै दरम्यान हिंगोली ते परभणी बससेवा बंद करण्यात केली होती. यादरम्यान, हिंगोली आगाराने आदेशाचे पालन करत औरंगाबादला जाणाऱ्या बसेस काही दिवस रिसोडमार्गे तर काही दिवस जिंतूरमार्गे सुरू केल्या होत्या.

३ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान परभणी जिल्हा प्रशासनाचा बसेस सुरू करण्याबाबत आदेश प्राप्त झाला. यानंतर चार बसेस परभणीसाठी सोडण्यात आल्या. ४ जुलैपासून परभणी मार्गे जाणाऱ्या सर्वच लांब पल्ल्याच्या बसेस नियमितपणे सुरू केल्या आहेत.

- कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना

कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी कोरोनाचे रुग्ण रोजच आढळून येत आहेत. लांब पल्ल्यांच्या बसेस तसेच जिल्हांतर्गतच्या बसेसच्या चालक-वाहकांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रवाशांनी मास्क घालूनच प्रवास करावा, सामाजिक अंतर ठेवावे, असेही आवाहन एस. टी. महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Long distance buses start parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.