कामगारांना लॉकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:27 AM2021-04-14T04:27:14+5:302021-04-14T04:27:14+5:30

हिंगोली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासन पुन्हा लॉकडाऊन लावण्यात तयारीत आहे. लॉकडाऊन लागले तर गैरसोय होऊ नये, ...

Lockdown of workers; Entrepreneurs threatened to go to labor villages | कामगारांना लॉकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती

कामगारांना लॉकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती

Next

हिंगोली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासन पुन्हा लॉकडाऊन लावण्यात तयारीत आहे. लॉकडाऊन लागले तर गैरसोय होऊ नये, यासाठी कामगार गावी परतण्याचे नियोजन करीत आहेत. तर कामगार गावी परत गेले तर व्यवसायाचे कसे होणार याची धास्ती उद्योजकांनी घेतली आहे.

राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात दोन वेळेस संचारबंदीचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला. आता तर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शासनसुद्धा चिंतेत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याच्या निर्णयापर्यंत शासन पोहचले आहे. त्यामुळे राज्यात केव्हाही लॉकडाऊन लागू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कामानिमित्त आलेले कामगार गावाकडे परत जाण्याच्या तयारीत आहेत. ऊसतोड कामगार तर दोन दिवसांपासून गावी परत येत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात बांधकाम कामगार, उद्योग क्षेत्र, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील, जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील कामगारांची संख्याही मोठी आहे. आता हे सर्व गावी परत जाण्याचा बेत आखत असल्याचे कामगारांतून बोलले जात आहे, तर कामगार परत गेले तर आपल्या व्यवसाय, उद्योगावर परिणाम होईल, याची भीती व्यावसायिकांना वाटत आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे व्यवसायावर परिणाम झालेला असताना पुन्हा कामगार गावी गेला तर व्यवसाय कोलडून पडण्याची धास्ती उद्योजकांनी घेतली आहे.

कामगार कुठे किती?

औद्योगिक वसाहत - १५०

हॉटेल व्यवसाय - १५००

बांधकाम क्षेत्र : ४३३०७

हाताला काम नाही, इथे तरी काय करणार ?

लॉकडाऊन लागले तर व्यवसाय ठप्प पडतील. त्यामुळे हाताला काम उरणार नाही. हाताला कामच नसेल तर इथे थांबून उपयोग काय, त्यामुळे लॉकडाऊन लागले तर गावाकडे परत जाणार आहे.

-मुन्ना यादव, गढवाल

लॉकडाऊन लागल्यास सर्व व्यवसाय बंद ठेवले जातात. त्यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. शिवाय शासनही मदत करीत नाही. त्यामुळे लॉकडाऊन लागल्यास इथे थांबण्यापेक्षा गावाकडे परत जाण्याचा बेत आखला आहे.

-परमवीर सिंग, पंजाब

लॉकडाऊनमध्ये गतवर्षी बांधकाम व्यवसायही ठप्प झाला होता. अगोदरच या व्यवसायात जास्त मजुरी नसते. त्यामुळे लॉकडाऊन काळात खायचे तरी काय ? लॉकडाऊन लागल्यास नक्कीच गावाकडे परत जाणार आहे.

-भगवान कोरडे

कामगार गावी परतला तर ...

लॉकडाऊन लागल्याने कामगार गावी परतला तर व्यवसाय ठप्प होईल. पुन्हा कामगार येतीलच याची श्वाश्वती नसते. तसेच नव्याने व्यवसायाला सुरुवात करावी लागेल. यात मोठे नुकसान होईल.

- राजेश जैस्वाल, हॉटेल व्यावसायिक

लॉकडाऊन लागला तर कामगार गावी परत जातात. गावाकडे गेलेला कामगार पुन्हा परत यायला उशीर करतात. यात व्यवसायाचे नुकसान होते. तसेच लॉकडाऊनमध्ये कामगारांनाही काम उपलब्ध नसते.

- ललीतराज खुराणा, उद्योजक

अगोदरच कामगार मिळत नाहीत. त्यात लॉकडाऊन लागला तर व्यवसाय ठप्प पडेल. त्यामुळे लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांसह कामगारांचेही नुकसान होईल.

- मंजूर खॉ चाँद खॉ पठाण, बांधकाम व्यावसायिक

Web Title: Lockdown of workers; Entrepreneurs threatened to go to labor villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.